<
जळगाव – (धर्मेश पालवे) – महाराष्ट्र हे सज्ञान लोकांच राज्य, जळगाव धुळे ,औरंगाबाद, नाशिक हे या राज्यातील उत्तर महाराष्ट्र तील महत्वाचे जिल्हे होय. इतिहास वाचला तर स्वातंत्र्य पूर्व आणि नंतर च्या काळात ज्या ज्या चळवळी झाल्यात त्यात या चारही जिल्ह्यातील नामवंताची नावे सामाजिक सुधारणेच्या वेळी घेण्यात आली. एव्हाना हेच नाही तर भारतीय महत्वाच्या घडामोडीत या चारही जिल्ह्यचा प्रत्येकी खारीचा वाटा दखावला जातो.
जळगाव हा जिल्हा त्यात महत्वाचा असाच आहे, सोन्याची नगरी,बनाना सिटी, दारुगोळा फॅक्टरी,औदयोगिक वसाहत ,मोठी बाजारपेठ,आदी गोष्टींनी या जिल्ह्याचे नाव भारताच्या नकाशात आवर्जून घेतले जाते, नव्हे तशी ख्याती या जिल्हयाने मिळवली आहे. त्याच बरोबर सामाजिक, औदयोगिक, आर्थिक बाबतीत जेवढे नाव जळगाव जिल्ह्याचे होते।
मात्र राजकीय मुद्यात हात घातल्यास या जिल्ह्याची प्रतिमा रंग नसलेल्या प्रतिमे सारखी अवस्था आपल्याला दिसते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ,आणि आता भाजपा अश्या अनुक्रमे सत्ता या जिल्ह्यात प्रस्थापित झाली,आणि लयास ही गेल्या मात्र पाहिजे तेवढा विकास या जिल्ह्याचा झाला नाही. बोटावर मोजण्या इतका विकास हा पुढारलेल्या समाजाचा करून घेण्यात त्या सत्तेत असणाऱ्या पक्षानि करून घेतला, आणि सर्वसामान्य समाज मात्र विकास नावा पासून दूर फेकला गेला तो आजतोवर तसाच दुर्लक्षीय आहे.
अश्यातच जिल्ह्याची आर्थिक स्थिती कोलमडून ,व्यावसायिक जजबा वरचढ झाला आणि शेतकरी देशोधडीला पोहचला, राजकर्णयांनी त्याचेही राजकारण करत मलिमा खाण्याचा विडा उचल्याची बोंब उठली.
सर्व सामाजिक विकास आणि उर्वरित समाजाची जवलंत प्रश्न यावर दृष्टिक्षेप च्या दृष्टीने मा मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यात दौरे जाहीर केले होते मात्र या ही महिन्यात नेहमी सारख त्यांनी दुर्लक्ष केलं आहे, येण्याचं टाळलं आहे. जळगांव मात्र जे आहे त्या अनुत्तरित प्रश्नातच खितपत पडले आहे. जाती पातीच राजकारण, गरीब श्रीमंतीची समीकरणे, भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे श्रुंगार घालून जळगाव शहर बिन मालकाची राणी होण्याची तयारी करत असल्याची मीमांसा खोटी ठरू नये.
शेवटी असे म्हणताना कमी पण वाटू नये की जळगाव शहर हे महाराष्ट्राच्या नकाशात मिटवण्याचा विडा या राजकारणी पुढारलेली समाज मंडळी ने उचलला आहे. आणि सुशिक्षित लोकांनी “हातावर घडी तोंडावर बोट” असे आचरण करून जळगाव शहराची खरी फसवणूक केली आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.