उस्मानाबाद, दि.21 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्यात दि. 13 मार्च 2020 पासून साथरोग अधिनियम 1897 ची अमलबजावणी सुरु झाली आहे. या अधिनियम अंतर्गत खंड 2 ,3 व 4 नुसार प्रदान करण्यासत आलेल्या अधिकारा नुसार कोरोना विषाणू (COVID-19) या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव रोखण्या्साठी विविध आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. सद्य परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्याचत कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. सदर रुग्णापैकी बहूसंख्य् रुग्णा हे उस्मानाबाद जिल्ह्या बाहेरुन आलेले होते. त्या च बरोबर इतर राज्यासतून व जिल्ह्या मधून प्रादुर्भाव क्षेत्रातून, शहरातून परवानगी घेवून मोठ्या प्रमाणात नागरिक उस्माुनाबाद जिल्ह्या मध्येद प्रवेश करत आहेत. अशा लोकांना गृह, संस्थाात्मक विलगीकरण कक्षामध्येा ठेवण्या त आलेले आहे. संशयित रुग्णांकचे कोविड-19 च्याथ अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
त्याथमुळे बाहेरुन आलेल्यात नागरिकांच्या बाबतीत गृह, संस्थात्मक विलगीकरणा बाबत खालील प्रमाणे निर्देश करण्याात येत आहे. दि. 10 मे, 2020 नंतर व यापुढील काळात राज्याहतील इतर जिल्ह्या्तून जसे की, मुंबई महानगर प्राधिकरण (MMR), पूणे महापालिका व पूणे महानगर प्राधिकरण (PMR), औरंगाबाद महानगर पालिका तसेच राज्यातील इतर जिल्ह्या मधील Containment Zone (प्रतिबंधित) ) मधून आलेल्याे नागरिंकावर विशेष लक्ष देण्यात यावे व त्यांचे दैनंदिन तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करावी.
मुंबई महानगर प्राधिकरण (MMR), पूणे महापालिका व पूणे महानगर प्राधिकरण (PMR), औरंगाबाद महानगर पालिका तसेच राज्यातील इतर जिल्ह्यामधील Containment Zone ( प्रतिबंधित) क्षेत्रामधून त्या प्राधिकाऱ्यांची परवानगी घेवून येणारे नागरिक आपल्या( कार्यक्षेत्रामध्येस आल्या नंतर त्यांयचा तात्काळ युध्दीपातळीवर शोध घेवून त्यांना संबंधित स्वतंत्र व सुरक्षित Quarantine केंद्रामध्ये व्यवस्था वेगळी करावी. त्यांना पूर्वीच्या Quarantine सेंटर मधील नागरिकामध्येे ठेवण्यात येवू नये. इतर जिल्ह्यातून आपल्यां जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची वाढती आकडेवारी लक्षात घेता तालुका मुख्यालयी स्वयतंत्रपणे (पूर्वीचे Quarantine Center वगळून) सुरक्षीत ठिकाणांची निवड करुन त्या ठिकाणी अशा नागरिकांना ठेवण्यारची व्यकवस्था करावी. अशा ठिकाणी सर्व सोयी-सुविधा मिळणे बाबतची खात्री करण्या साठी प्रत्येक Institutional Quarantine सेंटर साठी विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच प्रत्येक Quarantine सेंटरसाठी विविध विभागापैकी एका अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात यावी. Institution Quarantine ची जागा निवडताना तेथे ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांना स्वतंत्र तसेच सर्व व्यवस्था मिळू शकेल ( पिण्याचे पाणी, वापरण्यानचे पाणी, जेवण, Toilets, वैद्यकीय सुविधा- तपासणी इ. याची खात्री करावी) . इतर जिल्ह्या तून पास घेवून आलेल्याी नागरिकांपैकी लक्षणे नसलेल्याद लोकांना Home Quarantine करताना ते ज्याा घरामध्ये राहतात त्या घरातील सर्वांनाही Home Quarantine करण्यात यावे, तसे त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात यावेत. Home Quarantine चे नियम अत्यंत कडक स्वारुपामध्येत अंमलबजावणी करण्यात यावी. विनापरवाना प्रवेश करणारे नागरिक आढळल्यास त्यांचा शोध घेवून त्यांच्यावर नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करुन त्यांना वरीलप्रमाणे Quarantine करण्याची कारवाई करावी. वरील सर्व निर्देशांचे योग्य व काटेकोर अंमलबजावणी करुन Incident COMMANDER म्हणून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचे आदेश निर्गमित करुन सर्व कार्यवाही युद्ध पातळीवर पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.