जळगाव - विषबाधा झालेल्या रावेर तालुक्यातील तीन वर्षीय बालिकेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील पीआयसीयु विभागातील बालरोग तज्ञांनी केलेले उपचार यशस्वी ठरले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे बालिकेला जीवदानच मिळाले.
रावेर तालुक्यातील तीन वर्षीय बालिका ही घरात खेळत असतांना पाणी समजून काहीतरी विषारी द्रव्य सेवन केले. द्रव्य सेवनानंतर या बालिकेला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब बालिकेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच स्थानिक रूग्णालयात धाव घेतली. मात्र स्थानिक डॉक्टरांनी बालिकेला इतरत्र हलविण्यास सांगितले. अशा परिस्थीतीत कुटूंबियांनी बालिकेला तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या पीआयसीयु विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी बालरोग तज्ञ डॉ. विनय पाटील यांनी बालिकेची तपासणी करून उपचाराला सुरवात केली. बालिकेने सेवन केलेले विषारी द्रव पदार्थ काढण्यात वैद्यकीय तज्ञांना यश आले. विषारी पदार्थ काढल्यानंतर बालिका अवघ्या एका दिवसात शुध्दीवर येऊन तीच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होऊ लागली. दुसर्याच दिवशी बालिकेची प्रकृती धोक्याबाहेर आली. रूग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. विनय पाटील यांच्यासह टीमने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे बालिकेला पुन्हा जीवदानच मिळाले.
वेळ आणि उपचार महत्वाचे - डॉ. विनय पाटील
तीन वर्षीय बालिकेने विषारी द्रवपदार्थ सेवन केल्यानंतर तीची प्रकृती अधिकच बिघडली होती. मात्र तीच्या कुटूंबियांनी तीला वेळेत रूग्णालयात दाखल केल्याने गोल्डन अवर्समध्ये उपचार करणे शक्य झाले. अशा रूग्णांसाठी वेळ आणि उपचार हे महत्वाचे असतात असे बालरोग तज्ञ डॉ. विनय पाटील यांनी सांगितले.
सर्व सुविधा व डॉक्टरामूळेच जिवदान — रूग्णांचे नातेवाइक
या रूग्णालयात सर्व अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असून रूग्णांवर ताबडतोब उपचार करत असतांना डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन यामूळे चिंता दूर झाली. या रूग्णालयातील कर्मचा—यांनी देखिल सहकार्य केले. त्यामूळैच आमचे बाळ सुखरूप असून रूग्णालय प्रशासनाचे आभार मानावे तेवढे कमी असल्याची भावना नातेवाईकांनी बोलून दाखवली.