उस्मानाबाद (सत्यमेव जयते न्युज) :- उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी सकाळी शिराढोण येथील एक महिला कोरोना पॉजिटीव्ह आढळून आली आहे ती महिला लातूर येथे उपचार घेत आहे. तर उमरगा येथे गुरुवारी दुपारी एका महिलेचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी मध्यरात्री सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात परंडा १, वाशी १, लोहारा तालुक्यातील जेवळी ४ असे रुग्ण पॉजिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२ जणांचे स्वाब तपासणी साठी लातूर येथे पाठवले होते. त्यातील ६ अहवाल सकारात्मक (positive) आले आहेत. लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले ४ जन positive आले आहेत. तसेच वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील ६ वर्षाची मुलगी positive आली आहे. तसेच परंडा तालुक्यातील खांडेश्वरवाडीतील रुग्णाच्या संपर्कातील २७ वर्षाच्या तरुणाचा अहवाल सकारात्मक (positive) आला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सद्यस्थितीत रुग्ण संख्या २३ झाली असून त्यातील ४ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज केलेले आहे . तर १९ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.