जळगांव(प्रतिनीधी)- अँड.अभिजित रंधे यांचा नुकताच त्यांच्या सामाजिक कार्याच्या उपक्रमामुळे जनमत प्रतिष्ठान तर्फे त्यांनी लाँकडाऊन काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचा कडून रोज ३५० गरजूंना अन्न वाटप होत आहे. आता पर्यत २००० लोकांनी याचा लाभ घेतला असून आदिवासी पाड्यांवर देखील अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तून ची वाटप ही ते करत आहेत. समाजकार्य ची मशाल घेऊन काम करायला निघालेल्या या तरुणाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यार्थी चळवळीमध्ये तसेच सामाजिक स्तरावर सुद्धा ते अभिमानास्पद काम करत आहे. त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल अभिनंदन व पुढील कामा साठी त्यांना शुभेच्छा रोहन महाजन, रुपेश महाजन आदी मित्रपरीवारा तर्फे देण्यात आल्या.