उस्मानाबाद (सत्यमेव जयते न्युज) :- दिनांक 21.05.2020 रोजीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील २ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. आज ते दोन्ही व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. गुरुवारी पिंपळगाव मधील सहा वर्षाची मुलगी कारोणा पॉझिटीव्ह आढळून आली होती आज त्याच मुलीच्या आई आणि आजोबाला कोरोना झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा २५ वर पोहोचला आहे तसेच ६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तरी सद्यस्थितीत १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.