<
जळगांव-(धर्मेश पालवे)-उत्तर महाराष्ट्रात होणाऱ्या सतत धार पावसामुळे जळगांव, नंदुरबार सह धुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यात होणाऱ्या पावसाची पातळी इतकी वाढली की लहान मोठ्या नद्यांना पूर आले आहेत, आणि याचा परिणाम नद्यालगत असणाऱ्या गावांना वाईट तोंडाने भोगावे लागत आहे.
रोजगार, जनजीवन व रोजगाराच जीवन जगणे यामुळे असह्य होत आहे. आरोग्य व शिक्षण बाबतीत आज धुळे येथील शिरपुर मध्ये अरुणावती नदी आहे, त्या ठिकाणी नदीला भयंकर असा पाणीसाठा जमा झाल्याने पूर सदृश्य परिस्थिती झाली आहे. या नदी किनारी काही आदिवासी ३०० ते ४०० लोकवस्थीत झोपड्या बांधून राहतात, या वस्त्या पुरामुळे अक्षरश वाहून गेल्या आहेत. त्याच बरोबर जीवनावश्यक वस्तूही सोबत वाहून गेल्याच वृत्त आहे.या घटनेकडे सरकार गांभीर्याने घेईल अथवा नाही गुलदस्त्यात आहे, मात्र गांभीर्य ओळखत धुळे येथील शिरपूर सह शहरात नावाजलेल्या, व सरकारला नेहमी धारेवर घेत जनतेशी नाळ असणाऱ्या ,धुळे जिल्हा जागृत जन मंच च्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती डॉ सरोज पाटील यांनी मदत कार्य केलं आहे. अत्यावश्यक सर्व गोष्टी करण्यात त्या पुढे धजावल्या, याच ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा होती, जी पुरात सापडली आणि शाळेतील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढत या टीम ने खरदे या ठिकाणी स्थलांतरित करत विद्यार्थ्यांना वाचवले आहे. त्याच बरोबर मिळेल त्या भांड्यात भात करून सार्वत्रिक वाटप करून आधार दिला.आज आपण पाहतो देशात व राज्यात पाण्याच्या थेइमाना पुढे राज्यकर्ते विमानात प्रावस करून आढावा घेत मृत व पीडित लोकांचा अपमान करत आहे, कर्तव्य विसरून पक्ष सदस्य मेळावे व मंदिर फेरी मारत आहेत, मात्र ,खऱ्या अर्थाने जनसेवेची कास असणाऱ्या या डॉ सरोज पाटील यांनी महत्त कार्य केले आहे हे राज्यकर्त्यांना व शसनाला चपराकच आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींशी डॉ सरोज पाटील यांनी संपर्क साधून या गंभीर घटनेच्या बाबतीत बोलतांना सरकार वर विसंबून न राहता आपल्याकडून होईल तेवढी मदत पुरग्रस्तान करावी असे आव्हान केले आहे.