<
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 झाली
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 – जिल्ह्यातील भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 5 व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती भुसावळ शहरातील फालक नगर, गुंजाळ काॅलनी, गांधीनगर व दिपनगरातील आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.