<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका “रजनी केणी फाउंडेशन” च्या वतीने मुलुंड प्रभाग क्र.१०५ मधील गरीब व गरजू लोकांना धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये ५ किलो तांदूळ, ५ किलो पीठ, ३ किलो कांदे, ३ किलो बटाटे, २ किलो तूरडाळ, २ किलो साखर, खाद्य तेल, पाव किलो मसाला, पाव किलो हळद, चायपत्ती यांचा समावेश होता. सध्या लॉकडाऊन असल्याने कामधंदे व इतर सर्व गोष्टी ठप्प असल्याने गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आज खरी नागरिकांना मदतीची गरज आहे ही बाब लक्षात घेऊन नगरसेविका रजनी केणी फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सदर जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाबाबत नागरिकांनी नगरसेविका रजनी केणी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहे.