<
जळगाव-(प्रतिनिधी)दि.०७ रोजी सायंकाळी ४ वाजता विजयेंद्र हॉस्पिटल येथील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आपल्या सर्वांना उपयुक्त ठरेल म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती ग्रुपच्या अध्यक्ष अँड.भारती वसंत ढाके यांनी दिली.
या वेळी अँड.सुजल भोसले यांनी इन्शुरन्स, लायसन्स आणि मायनर(अज्ञान चालक) या विषयावर सउदाहरण देत मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.जयंती चौधरी या होत्या.कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने झाली, यावेळी डॉ. स्मिता पाटील यांनी मधुर आवाजात ईशस्तवन म्हटले.
अध्यक्ष आणि वक्त्या यांच्या स्वागत व सत्कारा नंतर ग्रुपच्या सदस्या हर्षदा तळेले आणि हर्षदा अत्तरदे यांनी कुटुंब सांभाळून MA IN YOGIK SCIENCE तर,हर्षा नारखेडे हिने समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि विशेष म्हणजे त्या युनिव्हर्सिटी टॉपर झाल्याबद्दल त्यांचे ग्रुपतर्फे कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमाचे वेळी ग्रुपमधील सदस्यांनी विषयाला अनुसरून एक नाटिका सादर केली. नाटिकेचा विषय होता,बाईक-गरज की देखावा.या नाटिकेचे लेखन कु.अनुजा चौधरी हिने केले होते तर या नाटिकेचे सुंदर असे सादरीकरण- वसुधा येवले, जयश्री रोटे, उषा राणे, शुभांगी महाजन, नेहा तळेले, संगीता रोटे, संगीता चौधरी यांनी केले.त्यानंतर वक्त्या अँड. सुजल भोसले यांनी मोटर वाहन कायद्यातील काही महत्वपूर्ण तरतुदींबाबत उपयुक्त माहिती दिली. वाहन मालक आणि चालक म्हणुन विमा आणि लायसन्सच्या बाबतीत कायद्याचे पालन करणे किती हितकर आणि आवश्यक आहे या बाबत उदाहरणांवरून पटवून दिले. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात वाहन सोपवितांना अनेक कायदेशीर, सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती इत्यादी बाबींचा विचार केला पाहिजे, यावरही मार्गदर्शन केले. पालकांनी आत्मवलोकन करून वाहनाचा कमीतकमी वापर करण्यासंदर्भात काही सवयी स्वतः जाणीवपूर्वक आत्मसात कराव्या आणि निव्वळ दिखावा आणि हौस म्हणून वाहनाचा वापर करणे प्रयत्न पूर्वक टाळावे, असेही त्यांनी सांगितले.सौ.मनीषा चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर अँड. भारती वसंत ढाके यांनी पुढील नियोजनाबाबत चर्चा करून आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.