<
जामनेर प्रतिनिधी–अभिमान झाल्टे
जामनेर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या वतीने श्याम चैतन्यजी महाराजांच्या हस्ते ‘एक घास प्रेमाचा आश्रमातर्फे चालविलेल्या अभियानांर्गत टाकळी बुद्रुक गावातील गरजू बांधवाना सोशल डिस्टन्सचे पालन करून अन्नधान्य वाटप करण्यात आले. किसी के काम जो आये उसे इन्सान कहते , पराया दर्द जो अपनाये उसे इन्सान कहते सब कुछ खुशी है तुम्हारे लिये, दुःख दर्द छोड डॉ हमारे लिये असे शामचैतन्य महाराजांनी उपस्थितांना सांगून कोरोना सारख्या भयंकर विषाणु सोबत आपण कसे लढायचे याविषयी माहिती दिली.
ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आमच्यासाठी आमचे डॉक्टर व पोलीस अधिकारी यांनी आपला जीव गमावले त्यांना.. श्रद्धांजली दिली. आपले प्रशासन आपल्याला वेळो वेळी सूचना देतं आहे त्याचे योग्य पालन केल्यास आपण कोरोना वर नक्की मात करु. विनाकारण घराबाहेर पडू नका. अत्यावशक असेल तरच बाहेर पडा. मास्क लावा आणि आपलं व परिवाराला या कोरोना रुपी राक्षसापासून वाचवा असे उपदेश श्याम चैतन्य महाराजांनी केले.
यावेळी सरपंच डॉक्टर अरुण सपकाळ, विनोद माळी, ईश्वर सपकाळे, अक्षय राजनकर , रोहित जंजाळ, आदित्य राजनकर व गावकरी उपस्थित होते.