<
कल्याण(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून लॉक डाऊन असल्यामुळे सर्व सामान्य जीवनमान विस्कळीत झाले आहे. कचरा वेचून पोट भरणारे तसेच हात मजुरी करून उपजीविका करणारे यांना काम धंदा नाही. रोजगार नाही. यामुळे कल्याण येथील फडके मैदान जवळील झोपडपट्टी वासीयांना उपासमारीची वेळ आली. अशावेळी सामाजिक बांधिलकी जपणारे व लॉकडाउन काळात गरजुंना सतत मदतीचा हात देणारे कृती फाऊंडेशन व सामाजिक कार्यकर्ते अरुण देशपांडे यांनी गरीबांना किराणा सामानाचे वाटप केले. सदर उपक्रम कृती फाऊंडेशनचे चार्टर्ड प्रेसिडेंट दिगंबर महाजन, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कल्याण येथे राबविण्यात आला. कृतीच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण मध्ये ठिक ठिकाणी फिरून कचरा वेचणार, फूटपाथ वर राहणारे, मातंग समाजातील टोपल्या विणणारे, रोजंदारी वरील मजुर, कल्याण रेल्वे स्टेशन रोड वरील गरजुंना देखील यावेळी किराणा वाटप करण्यात आला. दिगंबर महाजन, ओमप्रसाद महाजन, जयश्री महाजन, अरूण देशपांडे, निलश्री महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.