<
जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील प्रभात चौकात सुरू असलेल्या लोक संघर्ष मोर्चाच्या कॅम्प मायेच्या शिदोरीत जवळ जवळ ८० हजार लोकांनी लाभ घेतला आहे. त्यात झारखंड, पश्चिम बंगाल, उडीसा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्प्रदेश बिहार व महाराष्ट्र येथील प्रवासी कष्टकरी लोकांनी लाभ घेतला असून अजूनही कॅम्प सुरूच आहे. प्रवासी मजुरांसाठी मोफत जेवण, थंड पाणी, चहा-नाश्ता, चप्पल, औषधी, मेडिकल असिस्टन्स पुरवण्याचा सलग पंधरा दिवस सुरूच आहे.लोकसंघर्ष मोर्चाद्वारे आयोजित प्रवासी मजूर अन्नछत्र चालवण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चा प्रतिभा शिंदेंनी पुढाकार घेतल्यावर त्यांना सोबत क्रेडाई, वाजिद फाउंडेशन, महेश चावला, विनोद नाथांनी अशोक मंधान, सुजित पाटील, राजेश पाटील, प्रमोद पाटील, योगेश पाटील, जळगाव सर्कल योगेश ननवरे, चंदन भाऊ चोपडा, कास्ट्राईब संघटना, जळगाव तिन्ही तलाठी, श्रीकांत मोरे, किरण वाघ, फकीरा सपकाळे, तासिमभाई, गौतम सपकाळे, सिद्धार्थ शिरसाट, किरण भोळे, दामू भारंबे, सुमित साळुंके, अनील सपकाळे, कलिंदर तडवी, विजया नेरकर आदी सर्वांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून सर्व आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रवाशांची सेवा करत आहेत. याठिकाणी 20 तारखेपर्यंत ट्रकने जाणारे जवळपास दहा ते बारा हजार लोक दररोज आपली भूक भागवत होते. 20 तारखेनंतर प्रवाशी मजुरांचे प्रमाण कमी होवून आजपर्यंत रोज चार ते पाच हजार लोक या सुविधेचा लाभ घेतला असल्याचे लोकसंघर्ष मोर्चा प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.