<
उस्मानाबाद – विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 28.05.2020 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुण 44 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत. अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ जणांचे कोरोना रिपोर्ट आज दि.२८ रोजी पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यतील कोरोना रुग्णाची संख्या आता ६१ झाली आहे. पैकी १२ जण बरे झाले आहेत आणि ४९ जणांवर उपचार सुरु आहेत.