<
उस्मानाबाद :- आज दि २८ रोजी ४४ रिपोर्ट प्राप्त झाले असून उस्मानाबाद शहरातील ७ रुग्ण पॉसिटीव्ह निघाले असून पापनस नगर उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत तसेच दोन रुग्ण बेडगा येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत तरी सर्व मुंबई रिटर्न्स आहेत.
आज उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तसेच दोन inconclusive तर १ पेंडिंग तसेच ३३ नेगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले असून. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ६१ झाली असून १२ रुग्ण बरे झाले आहेत तर सद्यस्थितीत ४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.