<
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचा विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आकाश धनगर याला नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यातील गुणिजन गुणगौरव सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय महाराष्ट्र युथ आयडॉल 2020 हा पुरस्कार संस्थेच्या माध्यमातून जाहीर झाला आहे.
आकाश धनगर हा सर्वगुणसंपन्न असा विद्यार्थी आहे .बुद्धिबळाच्या खेळातून आपले नैपुण्य दाखवत तो विद्यापीठाच्या आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अनेक राज्य आणि राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाला .तर काही शिबिरांमध्ये त्याने राष्ट्रीय पातळीवर संघाचे नेतृत्व केले .बुद्धिबळ खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्याने युवकांसाठी खेडोपाडी जाऊन प्रशिक्षण घेतलेत .आजही ही बुद्धिबळ खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी तो सक्रिय आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक राज्ये, राष्ट्रीय शिबिरात सहभाग नोंदवून आपले कौशल्य दाखविले आहे.
नुकताच देशात कोरोना ने जे थैमान घातले आहे त्यात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत व विद्यापीठाच्या वतीने सुचित केल्या प्रमाणे शासनाचे आरोग्य सेतू व दीक्षा ॲप यांचा प्रचार प्रसार आणि डाउनलोड कामी महत्त्वाची भूमिका बजावली. सोबतच कोरोना जनजागृती बाबत शासनाची आयुष विभागाच्यावतीने असलेल्या होमियोपॅथिक गोळ्यांचे वाटपही त्याने स्वयंसेवकांच्या माध्यमातून सुरू केले आहे .वृक्षारोपण ,जलसंवर्धन आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता अभियान शासनाच्या विविध योजनांच्या प्रचार प्रसाराच्या निमित्ताने पथनाट्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमात सतत सहभाग नोंदवत असतो. त्याच्या या विविध कार्याची नोंद घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने राज्यपातळीवर आदर्श युवक म्हणून निवड करून महाराष्ट्र युथ आयडॉल अवॉर्ड 2020 त्याला जाहीर केला सदर पुरस्कार वितरण 3 सप्टेंबर मुंबई येथे होणार आहे.
.