<
फैजपूर(किरण पाटील)- सध्या देशभर कोराना या जिवघेण्या व्हाँयरसच्या विषाणूने हैदोस घातला असून त्यामुळे साऱ्याचे नियोजन कोलमडलेआहे . लाँकडाऊन आणी संचारबंदीमुळे सार्वजनिक उत्सव बंदी घातलेली आहे. या बंदीमुळे काहिना आपले विवाह लाबणीवर टाकले असले तरी बंहूतांश जण सरकारने दिलेल्या आदेशा नुसार घरगुती पद्धतीने विवाह सोहळा उरकुन घेण्यावर भर देत आहेत . आश्याच पद्धतीने कोचुर ता. रावेर येथे नुकतेच अत्यंत साध्या पद्धतीने शेतशिवारात निसर्गाच्या सानिध्यात विवाह सोहळा पार पडला. कोचूर येथील प्रा.सुधाकर गोसावी यांचा पुतण्या व मधुकर गोसावी यांचा मुलगा चि. हर्षल व तासखेडा ता.रावेर येथील हिरामण गीसावी यांची कन्या चि.सौ.का.वर्षा यांचा शुभ विवाह तासखेडा येथे नुकताच मोजक्या कुटुंबियासमवेत दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. यावेळी केवळ वधु व वराचे आई वडील मामा ब्राम्हण अशा मोजक्या लोकांची उपस्थिती होती . यावेळी सोशल डिस्टीनसिंगचे पालन करुन मास्क व सॅनिटीझरचा वापर करण्यात आला होता. या आदर्श विवाहाचे कोचुर व तासखेडा सह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.