<
फैजपूर(किरण पाटील)- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च पासून लॉकडाऊन घेण्यात आला होता ६६ दिवसानंतर दि.२८ मे रोजी कंटेंनमेंट झोन वगळता बहुतांश भागातील लॉकडाऊन उघडण्यात आल्याने फैजपूर शहरातील व्यवहार सुरळीत झाल्याने नागरिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खरेदी करीत होते. जळगाव जिल्ह्यातील दि.२८ मे पर्यंत कोरोना बाधित रुगणांची संख्या ५७१ झाली आहे. तर ६८ रुग्ण दगावलेली आहेत. अशी माहिती प्रशासनाने दिल्याने दुकानदार व ग्राहक यांचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाच्या नियमांचे पालन करून आपले व्यवहार सुरळीत ठेवत आहे. आज मात्र सुरळीत असले तरी पिढीही सुरळीत ठेवावे असेही जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.