<
कळंब, प्रतिनिधी | हर्षवर्धन मडके
जीवावर बेतलेल्या संकटातून एकाद्याची सुटका केल्यावर जे समाधान आणि जो आनंद मिळतो त्याचे मोल कधीच होऊ शकत नाही. अशीच एक घटना पहायला मिळाली कळंब तालुक्यातील मोहा येथील मोरे वस्ती वर एका माकडाला शॉक लागला होता आणि सर्वाना वाटले माकडाचा मृत्यू झाला म्हणून परंतु काही युवकांच्या लक्षात आले की माकड आणखी जिवंत आहे, जीव गेला नाही त्या नंतर त्या युवकांनी माकडाला पाणी पाजले आणि सर्वांनी त्याचे अंग चोळून त्याला शुद्धीवर आणले आणि त्याच्या अंगावर बऱ्याच जखमा होत्या. त्यामुळे नंतर युवकांनी डॉक्टरांना संपर्क केला आणि पुढे त्याला ड्रॉक्टर गायकवाड यांनी औषध उपचार केले माकडाचा स्थिती स्वस्थ होत होती आणि काही क्षणातच माकड सगळ्या समोर अगदी आनंदाने उड्या मारत माकड झाडावर चढून बसले, अगदी सर्वांचा आनंद मावेनासा झाला. एक तास सर्वांनी केलेलं परिश्रम त्याचे चीज झाले ही भावना तिथल्या प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होती.
माणसान माणुसकी अजून सोडली नाही, याच उत्तम उदाहरण पाहायला मिळाल ते मोहा गावात.
उपचार चालू असताना मांडीवर बसून पोटाला मारलेली घट्ट मिठी कधीच विसरू शकणार नाही या माकडा साठी पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा असे गणेश तोडकर यांनी सांगितले
या माकडाला जीवन दान देण्यासाठी संताजी वीर, महेश नागटीळक, हनुमंत बापू मडके, माऊली सुतार, अमोल मोरे, गणेश तोडकर, रोहन मडके यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.