<
दि. ३१ मे २०२०
इंदापूर (जि.पुणे) तालुक्यातील अशोकनगर येथे देशभरात कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव वाढला असून त्याला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये ज्या गरजू रुग्णांना रक्ताची अतिशय नितांत गरज आहे त्या रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान, यशवंत पाटील मित्र परिवार, अजिंक्य क्रीडा मंडळ अशोकनगर आणि प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सौ. सारिका दत्तात्रय भरणे (मामी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये तब्बल १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरास मोठा प्रतिसाद दिला. यामध्ये तरुणांचा उस्फूर्त सहभाग होता.
नागरिक लॉकडाऊन मुळे घरातच अडकल्याने रक्तदात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. विविध रुग्णांना आवश्यक असणारा रक्तपुरवठा कमी झाला होता त्यामुळे ही चिंता लक्षात घेऊन इंदापूर तालुक्याचे आमदार मा. श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान, यशवंत पाटील मित्र परिवार, अजिंक्य क्रीडा मंडळ अशोकनगर आणि प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यशवंत पाटील यांनी रक्तदाते तरुण मित्रांना वैयक्तिक फोन करून, विविध सोशल मीडियाच्या माध्यमांचा वापर करून रक्तदान करण्याचे आवाहन केले. हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडले.रेड प्लस ब्लड बँक भोसरी, पुणे यांच्या माध्यमातून डॉ. पोपटराव शिंदे यांनी रक्त संकलन केले. रक्तदात्यांची अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त संकलित केले असे डॉ. विजय भोसले व डॉ. कमलेश यांनी सांगितले.या रक्तदान शिबिरास महिलांनीही चांगला प्रतिसाद दिला.कु. केताली भरणे यांनी अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला जमेल तशी मदत करण्याचे व आपल्या जवळपास कुठे ही रक्तदान शिबिर आयोजित केले असेल तर तेथे जाऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले तसेच सौ. सारिका (मामी) भरणे यांनीही कोरोनाला घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आणि या सामाजिक उपक्रमास पाठिंबा दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक रक्तदात्यास रक्तदान प्रमाणपत्र आणि पाण्याचा ५ लिटर चा जार देऊन गौरविण्यात आले.एवढ्या संचार बंदीच्या काळातही रक्तदात्यांनी घराबाहेर पडून रक्तदान करण्याचे धाडस दाखवले त्याबद्दल सरपंच माधुरीताई पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.सामाजिक कामात कायम अग्रेसर असणारे, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती असलेल्या निःस्वार्थ भावनेतून यशवंत पाटील मित्र परिवार, अजिंक्य क्रीडा मंडळ अशोकनगर व प्रेरणा प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे व सर्व सदस्यांचे आणि कार्यकर्त्यांचे स्वयंशिस्त आणि सामाजिक अंतराचे पालन पाहून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी सौ. तेजस्विनी भरणे, श्रीराज भरणे, सरपंच माधुरीताई पाटील, ग्रा. पं. सदस्या सीमा ताई चव्हाण, मा. जि. प. सदस्य नंदराज थोरात, यशवंत पाटील, प्रदीप पाटील, गजेंद्र मोरे, रणजीत निंबाळकर, बाबाराजे निंबाळकर अजय गायकवाड, विठ्ठल ननवरे, बाबू मिसाळ यशवंत पाटील मित्र परिवार आणि अजिंक्य क्रीडा मंडळ अशोकनगर व प्रेरणा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.