Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2020
in राज्य
Reading Time: 3 mins read
राज्यभरात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्णांना घरी सोडले

आतापर्यंत ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडले

राज्यात कोरोनाच्या ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.३: राज्यात आज ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३६ खाजगी अशा एकूण ८२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ९७ हजार २७६ नमुन्यांपैकी ७४ हजार ८६० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३ हजार ६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दि. १ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून दि.१ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा (४.७४ टक्के) देखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.

राज्यात १२२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- ६० (मुंबई ४९, उल्हासनगर ३, ठाणे २, नवी मुंबई ३, वसई विरार १, भिवंडी १, मीरा भाईंदर- १), नाशिक- ८ ( धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १, नंदूरबार १), पुणे- २९ (पुणे १९, सोलापूर १०), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-१७ (औरंगाबाद मनपा १६, जालना १), लातूर- १ (उस्मानाबाद १), अकोला-२ (अकोला २), इतर राज्ये-३ (उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६९ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये (७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५८७ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते ३१ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई ३०,सोलापूर -१०,  औरंगाबाद -६, नवी मुंबई -३, धुळे -३, जळगाव -२, कोल्हापूर -२, ठाणे २, अहमदनगर -१, अकोला १, नंदूरबार -१,पुणे १ , उल्हासनगर १, वसई विरार -१ आणि उत्तर प्रदेशमधील १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४३,४९२), बरे झालेले रुग्ण- (१७,४७२), मृत्यू- (१४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव रुग्ण- (२४,५९७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१०,८६५), बरे झालेले रुग्ण- (३९९२), मृत्यू- (२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (६६३३)

पालघर: बाधित रुग्ण- (११९९), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (७१८)

रायगड: बाधित रुग्ण- (१२३८), बरे झालेले रुग्ण- (६४५), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव रुग्ण- (५४०)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२३५), बरे झालेले रुग्ण- (९४२), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२२५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१६५), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (९५)

धुळे: बाधित रुग्ण- (१७७), बरे झालेले रुग्ण- (९४), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (६३)

जळगाव: बाधित रुग्ण- (७८१), बरे झालेले रुग्ण- (३३०), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (३७७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (५)

पुणे: बाधित रुग्ण- (८४६३), बरे झालेले रुग्ण- (४५८५), मृत्यू- (३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (३५११)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१०३२), बरे झालेले रुग्ण- (४४८), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४९९)

सातारा:  बाधित रुग्ण- (५६४), बरे झालेले रुग्ण- (२०६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (३३६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६०७), बरे झालेले रुग्ण- (२१३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (३८८)

सांगली: बाधित रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (५९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (७०)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३१४), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (१९१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१६५३), बरे झालेले रुग्ण- (१०९५), मृत्यू- (८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४७४)

जालना: बाधित रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (९३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (८७)

परभणी: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४८)

लातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (५३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४९)

बीड: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव रुग्ण- (२१)

नांदेड: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (३०)

अकोला: बाधित रुग्ण- (६४७), बरे झालेले रुग्ण- (३५८), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव रुग्ण- (२५५)

अमरावती: बाधित रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (९७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१४८), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (७४), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२६)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (६३५), बरे झालेले रुग्ण- (३९२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२३२)

वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (६)

भंडारा: बाधित रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (१८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२७), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४५)

एकूण: बाधित रुग्ण-(७४,८६०), बरे झालेले रुग्ण- (३२,३२९), मृत्यू- (२५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव रुग्ण-(३९,९३५)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३६२ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६६१ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ९५० सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ७१.४८  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह धनादेशाचे वाटप; शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते वितरण

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन ६ कोरोना रुग्ण तर रुग्ण संख्या पोहचली ९४ वर

Next Post
उस्मानाबाद जिल्ह्यात ८ पॉझिटिव्ह रुग्ण तर 11 अहवाल प्रलंबित

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन ६ कोरोना रुग्ण तर रुग्ण संख्या पोहचली ९४ वर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d