<
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील झोपेत स्वाक्षऱ्या करतात की काय?
जळगांव (प्रतिनिधी):- माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ता दिपक सपकाळे यांनी १० जून २०१९ रोजी माहिती अधिकार अधिनियन २००५ नुसार जळगांव समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. जो अर्ज १७ जुलै २०१९ रोजी जनमाहिती अधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगांव येथे प्राप्त झाला होता. प्रश्न असा ही निर्माण होत आहे की तब्बल एक महिना हा अर्ज नेमका होता कुठे? तसेच सदर प्राप्त अर्जाची दखल पुढील येणाऱ्या संभाव्य तारखेस घेणे अपेक्षित असतांना, मात्र या कार्यालयातून दिपक सपकाळे यांना प्राप्त पत्रात १४ जुलै २०१९ रोजी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत येऊन हजर राहुन माहितीचे अवलोकन करून घेणे व माहीती प्राप्त करून घेण्याचे सुचवलेले आहे. आणि तरीही समाधान नाही झाल्यास पुढील अपिलीय अधिकारी नाशिक यांच्याकडे तरतुदीनुसार अपिल करण्याचा सल्ला दिला आहे.
अर्जदारास माहिती उपलब्ध करुन घेण्याची संभाव्य तारीख ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येणे अपेक्षित असतांना, सदर अर्जाची माहिती ही १४ जुलै २०१९ ला प्राप्त करून घेण्यासाठी पत्राद्वारे कळविले आहे. पण १४ जुलै २०१९ हि तारिख निघुन गेली असल्याने मुळ अर्जातील माहिती नेमकी कशी प्राप्त करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष हे पत्र ९ ऑगस्ट २०१९ रोजीचे पत्र दिपक सपकाळे यांच्या कडे दिनांक १० अॉगस्ट २०१९ रोजी ईमेलद्वारे प्राप्त झाले आहे. सदर पत्रावर समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांची स्वाक्षरी आहे. यावरून प्रश्न निर्माण होतो की साहेब झोपेत तर स्वाक्षऱ्या करत नाहीत ना? की कामाच्या अती जास्त वर्कलोडमुळे तर असे होत नाही ना? कारण काही असले तरी एखाद्या जबाबदार मोठ्या हुद्द्यावर असलेल्या अधिकार्याने असे डोळेझाक करुन स्वाक्षरी करणे बेजबाबदार पणाचे लक्षण असल्याचे बोलले जात आहे.
यापुर्वी देखील असाच तारंखाचा घोळ सदर कार्यालयाने केला आहे. अर्जदाराने सांगितले की, कितीवेळा या कार्यालयाच्या अशा चुकांच्या बाबतीत काना डोळा करायचा.
वरिल सर्व बाबींचा विचार करता असे दिसून येते की, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव या कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्याविषयी मोठ्या प्रमाणात उदासीनता व अज्ञान मोठ्या प्रमाणात आहे.