<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाच्या अत्यंत प्रतिकूल काळात संपूर्ण जग धास्तावलेले असताना आणि सोबत इतर अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जाताना बेरोजगारीचा समस्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातून अनेक युवक बेरोजगार झाले अशाच एका युवकाची एक छोटीशी गोष्ट. शिक्षण तसं मेकॅनिकल अभियांत्रिकीच,vजळगाव सारख्या छोट्या शहरात नोकरी करत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या निलेश अधिकार पाटील या युवकाची या कोरोना ताळेबंदीमुळे नोकरी गेली. घरी बसून करणार काय, मग तांत्रिक शिक्षणाचा उपयोग करून कुठल्यातरी मार्गाने रोजगार मिळवायचा या हेतूने आणि या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने या तरुणाने स्वतःच्या नऊ हजाराच्या बचतीतून ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेंसर मशीन निर्माण केले. तसा हा युवक मूळ कलमाडी-खोंडामळी जिल्हा नंदुरबार येथील मात्र सध्या रामेश्वर कॉलनी मेहरुन जळगाव येथे वास्तव्य. या मशीन निर्मितीत इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत त्यांनी त्याचा मित्र अजय पाटील यांची मदत घेतली आणि या मशीन ची निर्मिती केली खरतर हे सगळ करण्यामागे तो म्हणतो की कितीही अडचणी आल्या तरी ठाम उभं राहायचं. आज त्याचं मशीन बनवून तयार आहे त्याचा वापर आपण मोठ्या उद्योग, घरात, शोरूम इतर कार्यालय या ठिकाणी आपण करू शकतो अशा या गरीब युवकाला आपल्या मदतीची अपेक्षा आहे.
संपर्क जीन्स जंक्शन यश प्लाझा, जळगाव91567369639579574852