<
फैजपूर(किरण पाटील)- चिनावल ता.रावेर येथे उपसरपंच पदी परेश महाजन विजयी झाले आहे. दिनांक ६ जून रोजी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत भा.ज.पा. प्रणीत नम्रता पॅनलचे परेश मुकुंदा महाजन हे निवडून आलेले असुन सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ.भावना योगेश बोरोले या होत्या. तर ग्रामसेवक अशोक खैरनार हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून हजर होते. चिनावल ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेख अजगर शेख सिराज यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेसाठी दि.६ जून राजी चिनावल ता.रावेर ग्रामपंचायत कार्यालयावर झालेल्या उपसरपंच निवड च्या बैठकीत उपसरपंच पदासाठी परेश मुकुंद महाजन, तबस्सुम शेख अजमल व संदीप सुरेश टोके यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार वेळी संदीप टोके यांनी माघार घेतल्याने परेश महाजन व सौ.तबस्सुम शेख अजमल यांच्यात सरळ लढत होऊन परेश महाजन यांना १० मते तर सौ.तबस्सुम शेख अजमल यांना ९ मते मिळाली. १० मते मिळाल्याने परेश महाजन हे चीनावल च्या उपसरपंच पदी निवडून आले. उपसरपंच हे पद ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून काँग्रेसप्रणीत पॅनल कडे होते. निवडून आलेले भा.ज.पा. प्रणीत नम्रता पॅनलचे उमेदवार परेश महाजन यांच्या रूपाने संपुर्ण ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून आणली आहे. ग्रामपंचायतीच्या ७० वर्षाच्या इतिहासात प्रथमच बहुमताने एक हाती सत्ता आल्यामुळे भा.ज.पा. मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सदर निवडीवेळी सरपंच सौ.भावना बोरोले यांचे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते. सदर निवडणुकी वेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. भा.ज.पा. पॅनल प्रमुख बाजार समिती संचालक गोपाळ नेमाडे, माजी सरपंच योगेश बोरोले ह्याचे सह सर्व कार्यकर्त्यांनी उपसरपंच परेश महाजन यांचे अभिनंदन केले.