<
फैजपूर(किरण पाटील)- दि 5 जून 2020 रोजी राज्य महासंघाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सचिव ,शिक्षक आमदार विक्रम काळे व नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सदर ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव व माजी राज्य कार्यकारिणी सदस्य या सर्वांनी मिटिंग मध्ये सहभाग नोंदविला. राज्य कार्यकारिणीच्या या सभेमध्ये सर्वप्रथम शासनाकडे विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना 20 टक्के व 40 टक्के अनुदानाच्या टप्पा तात्काळ द्यावा हा प्रमुख ठराव एकमुखाने संमत झाला 24 वर्षानंतर निवड श्रेणी विनाअट लागू करावी, शालार्थ क्रमांक मिळालेल्या मान्यताप्राप्त कनिष्ठ प्राध्यापकांची थकीत बिले तात्काळ मंजूर करावे, ज्यांना मान्यता मिळाली परंतु शालार्थ क्रमांक आयडी मिळाला नाही ही त्यांना तात्काळ देण्यात यावा. इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवित असताना तुकडी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये कोरोना मुक्त झाल्याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयाचे चे वर्ग सुरू करू नये, ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने विशेष अनुदान उपलब्ध करून द्यावे, सेवानिवृत्त झालेल्या रिक्त जागांवर ती कर्मचारी भरती शासनाने परवानगी द्यावी , सेवानिवृत कर्मचाऱ्यांना तात्काळ टेन्शन उपलब्ध करून देण्यात यावे सन २०११-१२ पासून ते सन २०१८-१९ पर्यंतच्या वाढीव पदांना तात्काळ मान्यता द्यावी, सदर मिटिंग मध्ये जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश राणे, सचिव प्रा. नंदन वळींकर यांनी सहभाग नोंदविला प्रा. सुनील गरुड यांनी कनिष्ठ प्राध्यापकांच्या काही प्रमुख समस्या व मागण्या जिल्हा कार्यकारिणीला देऊन राज्य महासंघाच्या कार्यकारणी मध्ये प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात मार्गदर्शन केले. राज्य महासंघाच्या या बैठकीत नियमकांकडून उत्तर पत्रिका जमा करणे संदर्भात नाशिक विभागीय मंडळाचे सचिव माननीय नितीन उपासणी साहेब यांनी केलेल्या सहकार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. राज्य महासंघाच्या सर्व मागण्यांचा पाठपुरावा शासनस्तरावर करण्याचे आश्वासन आ विक्रम काळे, आ.डॉ. सुधीर तांबे यांनी राज्य कार्यकारिणीला आश्वासित केले बैठकीचे आभार महासंघाचे सचिव प्रा संतोष फासगे यांनी मानले