<
जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2019- 2020 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आईवडील, शेतकऱ्याची पती- पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही 1 व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांना ही योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे. तसेच 2019- 2020 या वर्षाकरीता अपघातग्रस्त शेतकऱ्यास, त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता असून सहभागी होण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2020 आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजचा शॉक बसणे, इत्यादि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहीना अपंगत्व येते, घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशावेळी –
अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2.00 लाख, अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय तसेच 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु. 2.00 लाख इतकी नुकसान भरपाई अनुज्ञेय राहील. अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु. 1.00 लाख इतकी नुकसान भरपाई अनुज्ञेय राहील.
आपल्या भागातील एकाद्या वहितीधारक शेतकऱ्यांचा अथवा त्याच्या कुटूंबातील सदऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या वारसदारास नुकसान भरपाई देय राहील, “ तरी या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे” तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालय ( सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव/ पाचोरा/ अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव आकाशवाणी शेजारी प्रशासकीय इमारत, जळगाव. विमा कपंनी- दि. युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरंन्स कंपनी लि. पुणे -40, विमा सल्लागार कंपनी – जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. नागपूर, दुरध्वनी 0712-6731210/215 टोल फ्री नं. 1800 233 3533, ई मेल –[email protected], वेब साईट – www.jaika.in. यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संभाजी ठाकूर, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.