<
जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११६५ वर पोहचली असून आजपर्यंत ९०६८ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यापैकी ७२३० तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ५९६ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून आज पर्यंत कोरोनामुळे १२६जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधितांची एकत्रित संख्या तालुका निहाय पुढील प्रमाणे – जळगाव शहर २३८, भुसावळ २५४, अमळनेर १६९, चोपडा ६३,पाचोरा ३५, भडगाव ८४, धरणगाव ३७, यावल ५५, एरंडोल २३, जामनेर ३९, जळगाव ग्रामीण २८, रावेर ८६, पारोळा २३, चाळीसगाव १७, मुक्ताईनगर नगर ९, बोदवड १ तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील ४ असे एकूण ११६५ रुग्ण कोरोना बाधित आहेत.
जिल्ह्यात सद्य स्थितीत ५५६ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून ४८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.त्यापैकी ४५ रुग्ण अत्यवस्थ आहेत.