<
कळंब, प्रतिनिधी :- आज दिनांक 09/06/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 54 samples शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून 14 पॉझिटिव्ह, 6 inconclusive व 34 निगेटिव आले आहेत.
पॉझिटिव रुग्णा ची माहिती —
12 रुग्ण उस्मानपुरा उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या रुग्णा च्या संपर्कातील आहेत. 2 रुग्ण हे नळदुर्ग येथील असून पुणे येथून आलेले आहेत . अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 137 कोरोना रुग्ण सापडले असून आतापर्यंत 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 76 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत आणि सद्यस्थितीत 58 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.