<
जळगांव(प्रतिनिधी)- UGC ने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेला अनुसरून माननीय मुख्यमंत्री ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन १० दिवस झाले आहे तरीही लेखी स्वरुपात अजून कोणताही शासकीय आदेश विद्यापीठांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेला नाही. राज्यपाल यांच्या परीक्षा आयोजित करण्याच्या घेण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला असुन त्यांची मानसिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालेलीआहे. आता परीक्षा आयोजित केल्या तर विद्यार्थी तणावात येऊन परीक्षांवर बहिष्कार टाकाण्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमधे सुरु झाली आहे. राज्य सरकारचे व राज्यपाल यांचे या अति गंभीर प्रश्नावर लक्षवेधून घेण्याकरिता आज ट्विटर वर मासूने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ऑनलाईन लढ्याची सुरवात केली आहे हॅशटॅग त्यामध्ये ७७००० हुन अधिक विद्यार्थ्यांनी ट्विट करून सहभाग नोंदविला आहे . सध्याचा कोरोना चा प्रादुर्भाव पाहता परीक्षा घेणं अशक्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना यूजीसी मार्गदर्शक सुचने प्रमाणे अंतर्गत मूल्यांकन आणि अगोदरच्या सत्रांचे सरासरी गुण देऊन त्यांना पदवी प्रदान करावी अशी आमची मागणी आहे.