<
धरणगाव/पाळधी(प्रतिनिधी)- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ”लॉकडाऊन ५” ३१ जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर काही भागात अटी शर्तीवर शिथिलता देण्यात आली आहे. दरम्यान ऑरेंज, ग्रीन, रेड झोन अशा तीन भागात विभागण्यात आले आहे. कोरोना पुर्णपणे बरा होण्याची लसीवर सध्या संशोधन सुरु आहे. पण कोरोनावर मात करण्यासाठी आता होमिओपॅथी मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. अशातच तालुक्यातील पाळधी गावात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यात खबरदारीचा उपाय म्हणून येथील सूर्या फाउंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने गावातील सर्व नागरिकांची व कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक अल्बम३० या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. प्रसंगी शाळेच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते तर उज्वला झंवर, शारदा भोई तसेच शिक्षकांचे सहकार्य लाभले.