<
आज मी देव पाहिला
माणसांतल्या माणूस कि तला
आज मी देव पाहिला.
महापूर ने सारा वेढा घातला.
दगडाला काही पाझर फुटेणा
साकड घालायला तु दिसेना
डोळे पुसाया तु काही येईना
तळमळत्या जिवाची यातना कळेना.
दोन्ही हात लागले कामाला
त्यात लागला देव दिसाया
दाही दिशानां सावरून या
जात-धर्माचा माणूस एकवटला.
दगडातील देव आता माणसांत भेटला.
फाटलेले आभाळ शिवाया देवदूत आला
दाटलेला कंठ सोडाया
माणसांतला माणूस आला.
आज मी देव पाहिला
माणसांतल्या माणूस की तला
आज मी देव पाहिला.