<
नागरिक हैराण! महावितरण विभागाचे दुर्लक्ष
जळगांव ग्रामीण(प्रतीनिधी)- जळके येथील विज उपकेंद्रांर्गत वसंतवाडी, वराड, विटनेर, लोणवाडी गावांना वीजपुरवठा केला जातो. त्यापैकी जळके गावातील पाणीपुरवठा व बजरंगपुरा या वस्तीतील वीजपुरवठा मागील दोन दिवसांपासून खंडीत आहे. जळके येथील उपकेंद्राचे अमित सुलक्षणे (जि.ई.) यांच्याकडे गावातील नागरिकांनी रोहीत्राची मागणी केली असता, ते नागरिकांना उडवा उडवीचे उत्तर देऊन वेळ मारून देतांना दिसून येत आहे. गावात अगोदर ६३केव्ही चे रोहीत्र होते, ते सहा अगोदर खराब झाल्याने त्याजागी बदलून लोड जास्त असताना देखील २५केव्ही चे रोहीत्र टाकले. २५केव्ही रोहीत्रावर ग्रामपंचायतीचा, पाणी पुरवठा आणि गावातील विजेचा भार आहे. अती विजेच्या भारामुळे २५केव्ही चे रोहीत्र नेहमी खराब होत असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अगोदरचे ६३केव्ही च्या रोहीत्राची मागणी करून सुध्दा ते त्यांचा मनमानी कारभार चालवताना दिसून येत आहे. गावात पर्यायी दोन रोहीत्र आहे, त्यावरून तात्पुरता वीजपुरवठा सुरळीत करता येऊ शकतो, पण त्यांचे कर्मचारी आणि अधिकारी उपकेंद्रात गप्पा मारण्यात व्यस्त आहे. पण नागरिकांच्या समस्या ते सोडवू शकत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांत महावितरण विभागाच्या विरोधात संतापाची लाट आहे.