<
पालकमंत्र्यांकडून राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन
अमरावती : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य आणि लोककल्याणकारी राज्य स्थापनेची प्रेरणा दिली. त्यांचे महाराष्ट्र व देशाच्या इतिहासातील स्थान अनन्यसाधारण आहे, अशा शब्दात पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृती दिनी अभिवादन केले.
पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, राजमाता जिजाऊ यांचे व्यक्तित्व हे नितीमत्ता, बुद्धिमत्ता व मुत्सद्दीपणा यांचा संगम होते. दीनदुबळ्यांना न्याय मिळवून देणारे रयतेचे स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा त्यांनी छत्रपती शिवरायांना दिली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना शौर्य, धैर्य आणि नेतृत्व गुणांचे धडे दिले. स्री रक्षण व सक्षमीकरणाचे संस्कार त्यांनी रुजवले. विदर्भाची कन्या असलेल्या या माऊलीने हा महाराष्ट्र घडवला. दीनदुबळ्यांच्या, रयतेच्या या माऊलीला मी विनम्र अभिवादन करते, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केले.