Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी मोठी संधी – उद्योगमंत्री सुभाष देसाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी मोठी संधी – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 18 : ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात कृषीमाल उपलब्ध असून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यास मोठी संधी आहे. शिवाय ग्रामीण भागात स्वस्त दरात जमीन उपलब्ध आहे. उद्योग विभाग गुंतवणूकदारांना सर्व सहकार्य करण्यास तयार आहे, त्यामुळे आगामी काळात देश-विदेशातील उद्योजकांनी महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

Maha Info Corona Website

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने ‘अँडव्हान्सेस इन स्मार्ट फूड प्रोससिंग टेक्नॉलॉजी’ या विषयावरील वेबिनारमध्ये श्री. देसाई प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विश्वनाथन, शरदराव गडाख, अशोकराव फरांदे, विक्रम कड आदी सहभागी झाले होते.

श्री.देसाई म्हणाले, देशातील 65 टक्के जनता कृषी क्षेत्रावर विसंबून असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा चौदा टक्के हिस्सा असावा हे भूषणावह नाही. फळे, भाज्या वाया जाण्याचे प्रमाणही 30 टक्के इतके असून त्याचे मूल्य सुमारे 1 लाख कोटींच्या घरात जाते. त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगांत मोठे काम करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात कृषी विकास आणि सेवा क्षेत्रासाठी सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय 12 फूड प्रोसेसिंग क्लस्टर आहेत. सोळा हजार छोटेमोठे- अन्न प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. यात अजून वाढ होण्याची गरज आहे. राज्य शासन आणखी पाच फूड प्रक्रिया पार्क सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी दिली.

राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभालेला आहे. किनारपट्टीच्या भागांत माशांवर प्रक्रिया, पॅकिंग करण्याची गरज आहे. जगातील अनेक देश कृषीमालाचे मूल्यवर्धनासाठी प्रयत्न करतात. भारतात तसाच फायदा व्हावा. मार्केटींग, ब्रँडिंग क्षेत्रात आपण उतरले पाहीजे. या क्षेत्रात रोजगाराच्या खूप संधी आहेत. स्मार्ट फूड प्रोसेंसिग क्षेत्र जग बदलून टाकू शकते, असेही श्री. देसाई म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून, समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

उमेद अभियानात महिला बचत गटांना मास्कविक्रीतून मिळाले सव्वासतरा लाख रूपये

Next Post
उमेद अभियानात महिला बचत गटांना मास्कविक्रीतून मिळाले सव्वासतरा लाख रूपये

उमेद अभियानात महिला बचत गटांना मास्कविक्रीतून मिळाले सव्वासतरा लाख रूपये

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo