<
धनाजी नाना महाविद्यालयात योग आणि प्राणायाम ऑनलाईन कार्यशाळा
फैजपूर(किरण पाटिल)- येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये एक सप्ताह ऑनलाईन कार्यशाळेचे उदघाटन प्रा. आरती गोरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी सर हे होते. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी के.सी.ई. सोसायटीच्या योग विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.आरती गोरे यांनी योगा बद्दल बरीच माहिती सांगितली. त्यांनी आजच्या कोरोना महामारीच्या घडीला माणसाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग उत्तम अस्त्र असल्याने प्रत्येकाने नित्यनेमाने योगा करावा असे सांगून योगाच्या अंतरंग व बहिरंग योग याविषयी माहिती सांगितली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात योगाचे सध्याच्या युगात ताण तणाव कमी करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी योग हे आपल्या प्राचीन ऋषी मुनींची देणगी आहे त्याचा जीवनात अंमल केल्यास निरोगी जीवन जगता येते असे सांगितले. डॉ. सतिश चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आरोग्यासाठी योग आणि त्यांचे महत्व याविषयी सांगितले. या योग आणि प्राणायामाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य प्रा. डॉ. गोविंद मारतळे हे करणार आहेत. दररोज होणारे उपक्रम पुढील प्रमाणे दिनांक १६ जून रोजी सामान्य व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि रील्याक्सएशन, दिनांक १७ जून रोजी सामान्य व्यायाम, योग, प्राणायाम आणि रील्याक्सएशन, दिनांक १८ जून रोजी सामान्य व्यायाम, योग, प्राणायाम आणि रील्याक्सएशन, दिनांक १९ जून रोजी सामान्य व्यायाम, योगासन, प्राणायाम, ओम उच्चार आणि रील्याक्सएशन, दिनांक २० जून रोजी सामान्य व्यायाम, योगासन, प्राणायाम, ओम उचार आणि रील्याक्सएशन, दिनांक २१ जून रोजी सामान्य व्यायाम, योगासन, प्राणायाम, ओम उचार, रील्याक्सएशन आणि प्रश्न मंजुषा होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश चौधरी यांनी केले, तर सुत्रसंचलन डॉ. गोविंद मारतळे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक यांनी केले व आभार प्रा.शिवाजी मगर यांनी मानले.