<
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नवीन मात्र साहित्य जुनेच
शहापूर-(प्रतिनिधी) – तालुक्यातील कसारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन इमारतीचे थाटात उद्धघाटन झाले पंरतु याठिकाणी अजुनही दर्जेदार आरोग्य सेवेचा अभाव असल्याचे चित्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्या रुग्णांना सेवा देतांना आरोग्य केंद्रात काम करणार्या कर्मचार्यांना जुन्याच साहित्यांचा वापर करुन घ्यावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी आर्थिक भूर्दंड सहन करून तालुक्याच्या ठिकाणी जाणे भाग पडत आहे.
ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागा अंतर्गत येणारे सर्वात मोठे २१ गाव आणि ९८ पाड्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणारे आरोग्य केंद्र म्हणून कसारा आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून नवीन इमारतीच्या बांधकामामुळे आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची गैर सोय होत होती. नुकतेच नवीन इमारतीचे उद्घाटन होऊन महिना उलटला असला तरी इथल्या आरोग्य सेवेची वाताहत कायम असुन रुग्णांचे हाल होत असल्याचे आजही दिसून येत आहे.
या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत आंतररुग्ण कक्ष सुरू झाला असुन तशी पाटी देखील लागली आहे. परंतु त्यात खाटांचा तुटवडा असल्याने रुग्णांना उपचारासाठी खर्डी व शहापूर रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. शिवाय रुग्णांच्या उपचाराला लागणारे साहित्य जुने तर आहेच त्यातही साहित्य अपुरे आहे. सध्यातरी अद्यावत साहित्याच्या प्रतिक्षेत कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याचे दिसून येत आहे. या बाबत संबंधित तालुका अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
याबाबत सत्यमेव जयते च्या प्रतिनिधी यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. टी. धानके यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही