<
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वर्क फ्रॉम होम द्वारा आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नर्सरी ते तिसरी पर्यत विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या योग स्पर्धा आयोजित करण्यात आला होता. यात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात हजेरी लावत उत्कृष्ट योगा करत शाळेच्या ग्रुप वर आपले फोटो पाठविले. योगा नियमीत केल्याने मन आणि शरीर निरोगी राहते व त्याचे अनेके फायदे ही आहेत. प्रसंगी पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहित केल्याबद्दल शाळेच्या वतीने पालकांचे आभार मानण्यात आले. या स्पर्धेत आर्या पाटील, जानवी राणे, अथर्व यशवंत पडार, आयुष संतोष पाटील, हर्शिता प्रकाश कोळी, तनिष्क हेमंत पवार, आदिब अनिस खान, रुद्र नितीन सोनवणे, वैभवी राहुल बऱ्हाटे, इशू हितेंद्र तिवारी, मृणाली रितेश चौधरी, परिधी सचिन अटनेरे, वैष्णवी हेमंत पवार, आयुष संतोष ढिवरे, आयान अश्पाक खान, केवल राहुल बऱ्हाटे, साक्षी नरेंद्र लोखंडे, चैताली रितेश चौधरी, यांनी आपले सहभाग नोंदवून पारितोषिक पटकावले.