<
फिरोज म्हणजे भेट असं अरेबियन भाषेत फिरोज या शब्दाचा अर्थ होतो, परमेश्वर काही लोकांना या जगात समाजासाठी भेट म्हणून या भूतलावर पाठवीत असतो, त्यातील एक आपले फिरोज भाई.बऱ्याचदा माणूस परिस्थितीवर मात करतो, पण नियती मात्र तसे घडू देत नाही. पण देवा कडून आलेले फिरोज भाई याला अपवाद ठरतात.
स्वतः गरिबीचे चटके भोगून आपलं आयुष्य जगत असताना त्यांनी दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. खरं तर फिरोज भाई हे काही फार श्रीमंत नाही आणि शिकलेले पण नाही, परंतु सामाजिक कार्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. नियतीला त्यांनी आडवे केलेले आहे. प्रचंड उर्जावान असलेला हा माणूस हाक देताच लगेच समोर उभा राहतो. फिरोज भाई चा जन्म हा जळगावचा जन्मभूमी व कर्मभूमी जळगावच पण नाव मात्र महाराष्ट्रभर त्यांचे वडील रफिक शेख आईचे नाव शेहनाज शेख यांच्या पोटी या सुपुत्राचा जन्म झाला. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा या उक्ती प्रमाणे फिरोजने आपले शिक्षण नूतन मराठा विद्यालय या शाळेत पूर्ण केले.मुळातच उद्योगी स्वभाव हातांना कामाची सवय यामुळे त्यांनी स्वतःचे कारगिल टी स्टॉल हा व्यवसाय सुरु केला.तोंडात साखर डोक्यावर बर्फ तर हातात अमृतुल्य आहे.अनेक लोक दूर दूरवरून त्यांचा चहा पिण्यासाठी येत असतात, यातूनच त्यांचे वैशिष्ट्य लक्षात येत.प्रसंग कुठलाही असो फिरोज भाई आपले तयार, मदत कशी करायची हे त्यांनाच माहित कारण हे रसायन वेगळंच आहे.त्यांच्या जीवनाचा दृष्टीकोन हा मुळातच निस्सीम, निःस्वार्थ आणि निर्व्याज. हि बटू मूर्ती कधीही गर्वाने अहंकारीत झाला नाही किंवा मोठेपणा दाखवला नाही.आजपर्यंत त्यांना भरपूर पारितोषिके मिळालीत पण त्यांनी कधीच ते तोंडावर दाखवले नाही. मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाऊंडेशन मार्फत सामाजिक कार्य सुरु आहे. कधी सिव्हिल हॉस्पिटल तर कधी झोपडपट्टी भागात कधी निराधारांसाठी तर कधी अंधारात खितपत पडलेल्या लोकांसाठी तर कधी कोरोना काळात तर कधी लहान मुलांसाठी अश्या अनेक ठिकाणी आणि आघाड्यांवर त्यांच कार्य अविरत चालू आहे. त्यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत गरजू, निराधार विध्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे,निराधार वृद्धांना कडाक्याच्या थंडीत शाल, स्वेटर देऊन मायेची उब दिलीय. निराधार, परितक्त्या, विधवा या महिलांना औषधासाठी खर्च देणे. स्वतःचा वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा करतात. तसेच शासनाच्या हाकेला प्रतिसाद देत.सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा,पर्यावरण,आरोग्य याविषयांवर रॅली काढून जनजागृती केली आहे.त्याच बरोबर कोरोना संकटकाळात मास्क वाटप, खिचडी वाटप, किराणा किट वाटप सुद्धा केले. परंतु याचा दर्प त्यांच्या आजूबाजूला कधी दिसतच नाही इतका तो सन्यस्त वृत्तीचा प्रापंचिक माणूस आहे. कुटुंबामध्ये पुत्र, पिता, पती म्हणून जेवढी जबाबदारी त्यापेक्षाहि अधिक जबाबदारी तो समाजात सहजतेने पेलत आहे. प्रत्येक पातळीवर त्याच मस्तीक, मन आणि मनगट यांचा समन्व्य करण्याचे सामर्थ्य त्यांना जणू काही देवानेच दिले की काय? हास्य मुद्रा नेहमीच कामात गुंतलेला असा कामसू तन मन धनाने समाज सेवा करणारा फिरोज भाई आपल्यासाठी तर एक भेटच आहे. त्याच्या पुढील प्रगतीसाठी आपले फक्त अल्प हात….आभाराचा भार कशाला गळ्यात फुलांचे हार कशाला हृदयातच घर बांधूया या घराला दार कशाला…
लेखन – नारायण के.पवार जळगाव