फैजपूर(किरण पाटील)- येथील कोरोना कोव्हीड सेंटरला सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली यावेळी आ.शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील त्यांच्या सोबत होते. फैजपूर कोव्हीड सेंटरला यात दाखल असलेल्या रुग्णांशी थेट संवाद साधून या कोव्हीड सेन्टरला चांगल्या सुविधा मिळत आहे वेळोवेळी औषधे, जेवण, मिळत आहे. त्यासोबत आयुष काढा, गरम चहा, नाश्ता अशा सर्व सोयी या कोव्हिडं सेंटरला मिळत आहे. तसेच रूग्णांना काही असुविधा असल्यास सांगा व त्या तात्काळ सोडवू असे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले. आपण सर्व जण भक्कम पणे कोरोना हरवू असे सांगत रुग्णांशी थेट संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांनी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या कडून या कोव्हीड सेन्टरचा आढावा घेतला यात कोव्हिडं सेन्टर ला १००% रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त होत आहे . त्यामुळे या फैजपूर कोव्हीड सेन्टरला रुग्णाची पसंती आहे त्यासाठी कोरोना कोव्हीड सेन्टरच्या कामकाज जिल्ह्यात उत्तम प्रकारे सुविधा देण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनीषा महाजन,बी.डी. ओ. डॉ नीलेश पाटील, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, डॉ कौस्तुल तळेले यावेळी उपस्थित होते.