<
जामनेर प्रतिनिधी–अभिमान झाल्टे
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार कार्यकारी दंडाधिकारी अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयल व पी.एम.परदेशी यांच्या सहकार्याने जामनेर तालुक्यात संशयीत रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात येत आहे. याकरिता नगरपालिका व नगरपंचायत भागात कर्मचारी तसेच स्वयंसेवक
ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
यामध्ये ताप, खोकला,श्रास घ्यायला त्रास होणे, वास न येणे, अन्नाला चव न लागणे, अधिक प्रमाणात हात पाय दुखणे, इ. लक्षण असलेल्या नागरिकांचे शहरी भागात नगरपालिका/नगरपंचायत व ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका/आशा स्वयंसेविका यांच्याकडे नाव, वय,लिंग,मोबाईल क्रमांक याची नोंद करून रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे.
गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी सर्व ग्रामपंचायतींना थर्मल गन,प्लस ऑक्सिमीटर,
सॅनिटाईझर,मास्क .आवश्यक सामुग्री व सर्वेक्षण कालावधीत ग्रामसेवक यांनी स्वतः उपस्तीत राहून अधिकाधिक लोकसहभाग वाढवून सर्वेक्षण टीमला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले.त्याचप्रमाणे
सर्व पोलीस पाटील सुद्धा सर्वेक्षण टीमला सहकार्य करतील असे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी सांगितले. ज्यांची तपासणी करणे आवश्यक आहे अशा रजीस्ट्रेशन झालेल्या नागरिकांची तपासणी ही उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सायंकाळी 5 ते 6 व शहरी भागातील नागरिकांसाठी 6 ते 7 या वेळेत तर पहुर परिसरातील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय पहुर येथे सकाळी 10 ते 11 या वेळेत करण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिका/नगर पंचायत किंवा वैद्यकीय अधिकारी/आरोग्य कर्मचारी यांचे पत्र आवश्यक आहे.
तरी नागरिकांनी घाबरून न जाता जास्तीत जास्त प्रमाणात सदर तपासणी करून घ्यावी.विशेषतः 50 वर्षांवरील नागरिक व ज्यांना डायबेटीस, ब्लड प्रेशर, दमा, इ.विकार आहे त्यांनी प्राधान्याने तपासणी करून घ्यावी असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, नोडल अधिकारी डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा मुख्यकार्यकारी नगरपालिका जामनेर राहुल पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत शेंदूर्णी साजीत पिंजारी यांच्याकडून करण्यात आले आहे.