<
अन्न प्रशासन विभागाने घेतले झोपेचे सोंग
अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी हप्ते घेत असल्याची चर्चा
अन्न प्रशासन विभागाची कारवाई बाबत बनवा बनवी
जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्ह्यासह शहरात प्रतीबंधीत अन्न पदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याची परिस्थिती असंताना अन्न प्रशासन विभाग मात्र झोपेचे सोंग घेतले आहे.
जळगाव शहर व जिल्ह्य़ात प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्रेते बाहेरच्या राज्यातून छुप्या पद्धतीने माल आनून मोठ-मोठ्या मार्केट मध्ये दुकाने थाटुन अन्न प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून अवैध गुटखा, तंबाखू, पानमसाला, सिगरेट वितरण (होलसेल विक्री) करित आहे.
दुकानांच्या पतत्यापासुन ते दुकान चालकांपर्यतची सर्व इंत्यभुत माहिती अन्न विभागातील अधिकाऱ्यांना असते परंतु कारवाई करण्यासाठी धजावत नाही. यामागे नेमके कारण काय? या अवैध खुटका विक्रेते व विभागातील अधिकारी यांच्यामधे काही आर्थिक हितसंबंध आहेत?
एकीकडे पोलीस प्रशासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करतांना दिसुन येतात, पोलीसांनी कारवाई केल्यावर अन्न विभागातील अधिकाऱ्यांना हस्तांतर करण्यात येते त्यात ही अन्न विभागातील अधिकारी आर्थिक देवाणघेवाण करुन प्ररकरण रफादफा करुन टाकतात असाच प्रकार मागिल पोलीस अधीक्षक श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एका कारवाईत झालेला आहे. पोलीस विभागाने प्रतिबंधीत अन्न पदार्थ जप्त करुन अन्न विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याकडे कारवाई करिता हस्तांतरित करण्यात आला होता परंतु संबधित अन्न सुरक्षा अधिकारी यांनी प्रतिबंधीत माल जागेवर सोडुन कारवाई न करता पळ काढला होता. यावरुन देखील लक्षात येते की अन्न प्रशासन विभागातील अधिकारी व विक्रेते यांच्यात नक्कीच काहीतरी आर्थिक हितसंबंध आहेत.
याबाबत वरिष्ठ अधिकारी देखील दखल घेत नाहीत, कदाचित वरिष्ठांनाही मलिदा पोहचवण्यात संबंधितांना यश मिळाले असावे. तसेच यामुुळे जनतेेच्य आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अशा प्रकारांमुळे व भ्रष्ट अधिकार्यांमुळे मात्र महाराष्ट्र राज्य अन्न प्रशासन विभाग बदनाम होत आहे. वरिष्ठ पातळीवर याची दखल न घेतल्यास सामान्य माणसाच्या मनात या विभागा बाबत रोश कायम राहिल