<
सावधान-पाणी पुरी खाताय का?
सुरक्षीत असल्याची खात्री करून मगच खा…
जळगाव – (चेतन निंबोळकर) – येथील आर टी ओ कार्यालयाबाहेर दररोज सद्याकाळी बर्याच खाद्यपदार्थाच्या हातगाड्या लागतात. या ठिकाणी जळगांव शहरातील खवय्ये विविध खाद्यपदार्थ खाण्यासाठी येत असतात. या मॉ भवानी चाट सेटंर नावाची पाणी पुरी हात गाडी लागत असते यावर प्रचंड गर्दी देखील असते, पण खवय्यांना माहितच नसते आपण जे खातोय ते सुरशीत आहे किंवा नाही?आज दिवसभर जळगाव शहरात सोशल मीडियावर या हातगाडी चा एक व्हिडिओ फिरत आहे. या व्हिडिओ च्या माध्यमातून या हातगाडी चालकाचे पितड उघडे पडले आहे. या ठिकाणी पाणी पुरी साठी वापरण्यात येणारे पाणी अतिशय घान व शेवाळे आलेले असल्याचे व्हिडिओ च्या माध्यमातून समोर आले आहे.
यावरुन लक्षात येते की उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या राक्षसाने किती अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे, हे आपल्याला या बातमीने स्पष्ट होते. दुषित खाद्यपदार्थ खाल्ल्याने होणारे आजार आणि मृत्यूच्या घटनांवरून स्पष्ट दिसते. मात्र, सरकारी विभाग याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. लोकांच्या जिवाशी खेळणारे लालची खाद्यपदार्थ विक्रेते दस्तावेज अपूर्ण असतानाही परवाने मिळवितात, या विषयाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर भविष्यकाळात मोठी हानी अटळ आहे. दुधापासून ते पाण्यापर्यंत अनेक दुषित पदार्थ विक्री केली जातात आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळून पैसा कमावला जातो.दुषित खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना ना कायद्याची भीती आहे, ना लोकांच्या जीवाची पर्वा. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे,नागरिकांच्या आरोग्याशी आणि प्रसंगी जीवाशी खेळून पैसा कमावत आहेत आणि सरकारी संस्था अशा व्यक्तींना डोळे झाकून खिरापतीसारखे परवाने वाटत आहेत.
ज्यांच्याकडे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची जबाबदारी आहे, अशा सरकारी संस्था किती बेजबाबदारपणे वागतात, हे अन्नातून होणाऱ्या विषबाधेच्या दररोज समोर येणाऱ्या घटनांमधून दिसून येते. एफएसएसएआयकडून हॉटेल आणि रेस्टॉरंटना तसेच भोजन व्यवस्थेशी संलग्न अन्य व्यवसायांना परवाने देताना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे की नाही, हेही नीट पाहिले जात नाही. एवढेच नव्हे, तर अनेकदा बनावट दस्तावेजांच्या माध्यमातून मागितले जाणारे परवानेही दिले जातात आणि हानिकारक पदार्थांच्या विक्रीस खुली मुभा देऊन दुषित अन्नाविरुद्ध केलेल्या कायद्यांची खुलेआम थट्टा केली जाते.नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या त्रासदायक घटनांची संपूर्ण साखळी समोर दिसत असताना त्याची कुणाला चिंता वाटत नाही, हा खरा चिंतेचा विषय आहे. लोक स्वतःच आपल्या आरोग्याविषयी किती निष्काळजी राहतात, हेच यातून दिसून येते. आपल्या देशातील उघड्यावर केली जाणारी खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता याविषयी काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेतील भोंगळपणा, विस्कळीतपणा आणि बेजबाबदारपणा उघड होतो. शुद्ध आणि खाण्यास सुरक्षित खाद्यपदार्थ मिळणे हा आपला हक्क आहे आणि ते उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, हे आपण आधी मान्य केले पाहिजे.
याबाबतीत मात्र अन्न प्रशासन विभाग दुर्लक्ष करित आहे. अन्न विभागाकडून कधिच या हातगाड्या वरिल अन्न पदार्थांची तपासणी केली जात नाही. अन्न विभागाचे अधिकारी फक्त आर्थिक हितसंबंध जोपासन्यात अव्वल असल्याने जळगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यापुर्वी देखील सत्यमेव जयते ने शहरातील एका चिकन सेंटरच्या सडलेल्या चिकन विषयी पोलखोल केली होती परंतू अन्न प्रशासन यांच्यावर कारवाई करतांना मात्र दिसुन येत नाही.
सर धन्यवाद आपण माॅ.भवानी चाट सेन्टर ची छान बातमी दिल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. यामुळे आपण सोशल मिडियामाध्यमातुन जनहिताचे कार्य करत आहात. हा व्हिडिओ व फोटो मी काढलेले आहे. चित्रकार सुनिल दाभाडे सर
yor mobile send me.