<
कळंब, प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके)
कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला कळंब तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील मोहा , शिराढोण, येरमाळा, इटकुर, खामसवाडी व इतर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांनीही बंद पाळत उस्फुर्त सहभाग घेतला आहे. मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच, रिक्षा, टमटम बंद असल्याने सकाळपासूनच उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. सकाळी सात वाजल्यापासून गजबजणारी ठिकाणी ओस पडलेली दिसून आली.
शिराढोण मध्ये नागरिकांनी कर्फ्युला चांगला प्रतिसाद दिला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला शिराढोण ता. कळंब येथे नागरिकांनी सकाळ पासून सायंकाळपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज शनिवार दि.११ जुलै रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकाळच्या वेळेस चांगला प्रतिसाद दिला असून सर्व व्यापारी दुकाने बंद आहेत यामुळे रस्त्यावर आणि गावात शुकशुकाट बघायला मिळत आहे.
मोहा मध्ये कडकडीत बंदमोहा येथील ग्रामस्थांनी बंदला उस्फुर्त प्रतिसादाला दिला असून सकाळपासून किराणा तसेच इतर सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोना विषयी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
येरमाळा ता. कळंब येथे आज जनता कर्फ्यु ला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला सकाळ मोठ्या प्रमाणात गजबजलेल्या गाव चौकात एकही नागरीक नसून सर्वच दुकाने बंद आहे.