<
जळगाव – (प्रतिनिधी) – पीपल्स रिपब्लिकन पार्टी जळगाव जिल्हा उपअध्यक्ष यांनी युवा स्वाभिमान पार्टी अमरावती शेकडो लोक सोबत युवा स्वाभिमान पार्टी प्रवेश केला.सविस्तर असे की मुक्ताईनगर चे मा. महेंद्र भाऊ पाटील( पीपल्स रिपब्लिकन पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष तथा श्री छत्रपती सेना जिल्हाध्यक्ष व भारतीय ओड्बसम क्रांति महाराष्ट्र प्रचारक असे 3 पदे 3 वर्षा पासुन काम पाहत होते. बहुजनांच्या हक्कासाठी ते नेहमी मदत करायचे त्यांना भुसावळ चे जगन भाई चे कट्टर समर्थक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांनी बॉलीवुड कलाकार वरणगाव सारख्या छोट्या शहरात धूमधाम केली होती. पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह दिनांक ११-८-२०१९ रोजी त्यांनी रोजी वरिल पदांचा राजीनामा देऊन आमदार रवी राणा संस्थापक अध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी तसेच खासदार सौ. नवनीत कौर राणा मार्गदर्शकी युवा स्वाभिमान पार्टी यांच्या कार्याला पाहून पार्टीत प्रवेश केला. यावेळी युवा स्वाभिमान पार्टी चे प्रदेश महासचिव शैलेन्द्र कस्तुरे उपस्थित होते आणि खान्देश चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते त्याच प्रमाणे जळगाव युवक अध्यक्ष प्रतीक भाई सपकाळे व प्रथमेश मेढे उपस्थित होते.