<
जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील कोविड केअर ग्रुपच्या वतीने आज मेहरुण साईबाबा मंदिर येथे नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये नागरिकांना थर्मल टेस्टिंग तसेच मास्क वाटप करण्यात आले. शहरात कोरोना पाय पसरत चालला असून त्याचा प्रतिबंध व्हावा म्हणून शासनाला हातभार लागावा म्हणून शहरातील विविध संस्था पुढाकार घेताना दिसत आहे. अशातच शहरातील हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट, मौलाना आझाद फाउंडेशन, स्वामी समर्थ फाउंडेशन, सूर्या फाउंडेशन, सेवक सेवाभावी संस्था, कमलकेशव प्रतिष्ठान, सच्ची निस्वार्थी शक्ती सेवा, अमन फाउंडेशन, भक्ती मेडीको यांनी एकत्र येऊन कोविड केअर हेल्प ग्रुप स्थापन केला असून या ग्रुपच्या माध्यमातून जळगाव शहरात व ग्रामीण भागात नागरिकांना कोविड प्रतिबंध माहिती तसेच जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांची थर्मल टेस्टींग केली जाते. तसेच परिवारासाठी आर्सेनिक अल्बम-३० या कोरोना प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप देखील यावेळी केले. सुरक्षिततेसाठी प्रत्येक व्यक्तीस मास्क वाटप केले. तसेच कोरोना बाबत जनजागृती पत्रके वाटप करण्यात आली. प्रसंगी डॉ. सोनाली महाजन, डॉ. महेंद्र काबरा, डॉ. स्वाती सोनवणे, डॉ. नलिनी महाजन, सुरज सुनील झवर, अनिल कासाट, अतुल पाटील, जिनल जैन, डॉ. अशरफ बागवान, स्थानिक नगरसेवक प्रशांत नाईक यांचे अनमोल सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वीतेसाठी भारती काळे, राकेश कंडारे, फिरोज शेख, निशा पवार, विशाल शर्मा, प्रतीक्षा पाटील, हर्षाली पाटील, अर्चना सूर्यवंशी, भारती म्हस्के, अॕड. अभिजित रंधे, वर्षा पाटील, शरीफ शेख बागवान, उज्वला टोकेकर, धनश्री पाटील, दक्षता पाटील, किरण कोळी आदींनी परिश्रम घेतले.