<
जळगाव (शहर प्रतिनिधी) ट्रॅडिशनल डान्स असोशियन इंडिया आणि जळगाव जिल्हा नृत्य प्रशिक्षण कमिटीतर्फे आज जळगाव जिल्हाधिकारी यांना नृत्य प्रशिक्षण वर्ग आणि एरोबिक झुम्बा फिटनेस प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. कोरणा मुळे गेल्या पाच महिन्यांपासून लाॕक डाऊन सुरू आहे. गेल्या पाच महिन्या पासून नृत्य फिटनेस एरोबिक झुंबा प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. प्रशिक्षण वर्गावर सर्व नृत्य प्रशिक्षकांचे उपजीविकेचे साधन असून याशिवाय त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची उत्पन्नाचे स्त्रोत नाही. त्यामुळे सर्व कोरिओग्राफर व नृत्य प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली असून त्यावर मार्ग म्हणून गेल्या पाच महीन्यापासून लाॕकडाऊन डाऊन मुळे बंद असलेले प्रशिक्षण वर्ग सोशल डिस्टंसिंग नियमानुसार सुरू करण्यास परवानगी द्यावी . नृत्य व फिटनेस प्रशिक्षण वर्गासाठी भाड्याने घेतलेले असून लाॕक डॉन मुळे उत्पन्न स्थगित झाले आहे , त्यामुळे हॉलचे भाडे रद्द व्हावे .त्याचप्रमाणे सर्व नृत्य कलाकारांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, जेणेकरून नृत्य प्रशिक्षक व कोरिओग्राफर यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकेल. या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांना प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी. सोशल डिस्टंसिंग चे नियम व अटी मान्य असतील अशा आशयाचे निवेदन बी आनंद कुमार यांच्या नेतृत्वाखाली मयूर अहीराव, दीपक नेवे, सचिन पाटील, नरेश बागडे ,योगेश मर्दाणे ,गौरव नाथानी ,भगवान पाटील, विकास जोशी, सागर सोनवणे ,अश्विन तांबे यासह नृत्य अनेक क्षेत्रातील मंडळी यावेळी निवेदन देण्यास उपस्थित होते.