<
जळगाव (प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थी स्वयंअध्ययन पुस्तिकेद्वारे शिक्षण घेत आहेत शाळा बंद असली तरी शिक्षण चालू आहे. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्या पर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे कार्य शिक्षक करीत आहे पण जे पालक गरीब आहेत आहेत ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल नाही त्यांच्या शिक्षणाचे काय? यावर उपाय म्हणून सुवर्णलता अडकमोल या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययन पुस्तिका तयार केली शिक्षणापासून गरीब विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून हा उपक्रम राबवित आहे. पुस्तिका तयार करून त्याची छपाई करून छपाईचा खर्च स्वतः करून विद्यार्थ्यांना हे पुस्तिका मोफत देण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाचन लेखन वेग गती कमी जास्त असतो म्हणून त्या पुस्तिका भरून काढण्यासाठी एक हप्त्याचे कालावधी दिला जात आहे पुस्तिका भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती शाळेत जमा करायची आहे व पुढच्या नवीन अभ्यासाची पुस्तिका घेऊन जायची आहे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. मूळाक्षर, बाराखडी,शब्द वाचन, अक्षर वाचन, संख्याज्ञान, अंक वाचन, अक्षर वाचन, पाढे, छोटे छोटे गणिती क्रिया असलेले उदाहरण इंग्रजी बेसिक ज्ञान असा वेगवेगळा अभ्यास विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे अभ्यासाचा पाया पक्का होईल. मोबाईल पासून वर होणारे दुष्परिणाम टाळता येतील. सोशल डिस्टंसिंग च पालन करून तसेच सॅनिटायझरचा वापर करून ठराविक पालकांना बोलावून ठराविक दिवशी पुस्तिका वाटप केली जात आहे. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांनी कौतुक केले.