Tuesday, July 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कल्याण – डोंबिवली येथे कोविड समर्पित काळजी केंद्र, चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कल्याण – डोंबिवली येथे कोविड समर्पित काळजी केंद्र, चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

केवळ सुविधाच नव्हे तर वेळीच रुग्ण सेवा, योग्य उपचार मिळण्यास प्राधान्य द्यावे– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे दि 25 : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कोरोना संकटात महाराष्ट्र शासन खंबिर आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना त्यांनी दिल्या.

रुग्ण सेवा अधिक महत्वाची

केवळ मोठमोठया सुविधा उभारून चालणार नाही तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे यावर भर देण्यास सांगितले.

ढिलाई नको

संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. आज आपण या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत.

कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची  तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधा आणि साथीचे प्रमाण व्यस्त आहे. प्रभावी औषधे हातात येईपर्यंत आपल्याला अधिक सजग असणे आवश्यक आहे. गलथानपणा, ढिलाई आपल्याला परवडणारी नाही. आपल्याकडे सुरु असलेल्या उपचारांची गाईडलाईन तपासुन घेणे आवश्यक आहे. राज्याच्या टास्कफोर्स कडून संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

या संकटात सर्व यंत्रणा न डगमगता पाय रोवून उभे राहिलात त्यामुळे तुमचे मन:पूर्वक धन्यवाद देतो असे सांगुन ते म्हणाले की,संपूर्ण राज्यात जेथे आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य देण्यात येईल. कोरोना व्हायरसला हरविणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असले तरी आपण एकजुटीने त्यावर मात करु असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या बाबत नागरिकांच्या मनातील भय दुर करण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्याबरोबरच समुपदेशन उपलब्ध करुन देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.

डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ + 4 मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे 5000 स्क्वे.फीट च्या प्रशस्त जागेत 70 बेड त्यापैकी 60 ऑक्सिजन सुविधा असलेले व 10 सेमी आयसीयू बेड असणार असून दुस-या मजल्यावर काम करणारेम डॉक्टरर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिस-या मजल्यावरती 5000 स्के.फीट च्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड व 4 थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड रुग्णांकरीता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कँन्टींग सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरीता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वॉयफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणाव रहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात 1 रुपी क्लिनीक डॉ. राहुल घुले यांचेमार्फत चालविण्यात येणार असून एकुण 2 एमडी फिजीशियन, 25 निवासी डॉक्टर ,50परिचारिका व 30 हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.

कोविड आरोग्य केंद्र कल्याण


कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या प्रशस्त जागेत कोव्हिड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये 100 ऑक्सिजनचे बेड, 84नार्मल बेड ,10सेमी आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या सेंटर मध्ये 12 डॉक्टरर्स, 20 नर्सेस, 20 वॉर्ड बॉय आणि फिजीशियन देखील उपलब्ध असतील

कल्याण येथे सुसज्ज प्रयोगशाळा

कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे स्वत:चे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी. तत्वावर क्रष्णा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून तयार होत असून तेथे दररोज 3000 चाचण्या होवू शकतात.

यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोरोनाची आव्हान पेलण्यासाठी ठाणे जिल्हा अज्ज असून येणाऱ्या काळात या भागातील संसर्ग परिणामकारकरित्या रोखू तसेच उत्तम सुविधांची उभारणी करू असा विश्वास व्यक्त केला. कल्याण डोंबीवली महापालिका परिसरात रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे. महापालिका व लोकप्रतिनिधी एकत्र मिळुन काम करतायेत त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो आहे असे सांगितले. तसेच महापालिकांना अर्थिक मर्यादा आहेत परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत आहेत. ट्रँकींग व ट्रेसिंगवर विशेष भर देण्यात येत असुन येथिल नागरिकांना सर्व सुविधा कल्याणमध्येच उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचेही श्री शिंदे यांनी सांगितले.

मनपा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका काय उपाययोजना करीत आहे त्याविषयी सांगितले.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार राजू पाटील,विश्वनाथ भोईर,रवींद्र चव्हाण महापौर विनिता राणे,सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे,विरोधी पक्ष नेते राहुल दामले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांसह नगरसेवक, मनपा अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सरस्वती विद्यामंदिरात विद्यार्थी घेत आहेत स्वयं अध्ययन पुस्तिकेद्वारे शिक्षण

Next Post

जामनेर तालुका शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष सह सचिव यांच्यावर मालमत्ता अपहाराचा गुन्हा दाखल

Next Post
जामनेर तालुका शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष सह सचिव यांच्यावर मालमत्ता अपहाराचा गुन्हा दाखल

जामनेर तालुका शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष सह सचिव यांच्यावर मालमत्ता अपहाराचा गुन्हा दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.

    %d

      Notifications