<
जामनेर/प्रतिनिधी –अभिमान झाल्टे
जामनेर तालुकेचे माजी आमदार आबाजी नाना पाटील सह गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर नारायण चौधरी , माधव देशपांडे यांच्यावर संगणमत करुन शैक्षणिक संस्थेची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल जामनेर पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आला.
जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचा विश्वस्त मंडळात निवडणुकी विषयी विविध वाद सहाय्यक धर्मदाय आयुक्त जळगाव यांच्या न्यायालयात प्रलंबित आहेत.
सन 1998 ते 2003 या काळाकरता होता.
त्या काळामध्ये आबाजी नाना पाटील अध्यक्ष म्हणून आणि इतर लोकांचे विश्वस्त म्हणून फेरफार कळविला होता.
सदरच्या फेरफार मध्ये सचिव म्हणून नारायण देवचंद चौधरी हे नमूद केले होते सदर फेरफार संदर्भात 30/ 1/ 2020. रोजी साहेब धर्मदाय आयुक्त जी .एस .जोशी यांनी निकाल देऊन फेरफार अर्ज नामंजूर केला आहे सन 2018 ते 2023 या काळाकरिता दोन समांतर कार्यकारी मंडळ अस्तित्वात आहेत,त्यासंबंधीचा वाद प्रलंबित आहे .
कोणत्याही कार्यकारी मंडळाला मान्यताप्राप्त नाही तरी यातील आरोपी क्रमांक 1) म्हणजेच आबाजी नाना पाटील हे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नसतांना व आरोपी क्रमांक 2) नारायण देवचंद चौधरी हे संस्थेचे सचिव नसतांना व त्यांनी कोणत्याही प्रकारचा विश्वस्त मंडळाचा ठराव न घेता किंवा धर्मदाय आयुक्त नाशिक यांची परवानगी न घेता संस्थेची जामनेर येथील गट क्रमांक (564) 2 हेक्टर ही जमीन कमी किमतीमध्ये आरोपी क्रमांक 3) माधव अनंतराव देशपांडे यांना विकली अशाप्रकारे यातील आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादीची व संस्थेची फसवणूक केली .
अशी फिर्याद संस्थेचे संचालक व मा.नगरसेवक माधव विठ्ठल चव्हाण रा.बजरंगपुरा जामनेर यांनी जामनेर पोलीस स्टेशनला दिली आहे त्यावरून भा.दं.वि.कलम 420, 406, 408, 465, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास जामनेर पोलिस करीत आहे.