<
मुंबई :कोरोनाचा प्रादुर्भावर वाढत असतानाही गोरेगाव पूर्व येथील सिंधुदुर्ग एकता संघाने माणुसकी तसेच सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवित सुमारे १०० गरजुंना ‘एक हात मदतीचा’ पुढे करीत गरजुंना अन्नधान्याचे वाटप केले आहे. कोरोनामुळे देश गेल्या तीन ते चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. यामुळे सर्व सामान्य जनता भरडली गेली आहे. राज्य शासनाने काही अटी व शर्तीवर खाजगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी दिली असली तर अनेकांना आपल्या नोकर्या गमवाव्या लगल्या आहेत. अनेकांना दोन महिने पगारही मिळालेला नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत असल्याने घराचा मासिक खर्च कसा भागवायचा, अशी चिंता सतावत आहे. या कठीण समयी विविध लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांकडून गरजुंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. परंतु अद्यापही अनेक गरजुंना अन्नाधान्याची गरज असल्याचे लक्षात येताच गोरेगाव पूर्व येथील सिंधुदुर्ग एकता विकास संघातर्ङ्गे आगा खान एजन्सी ङ्गॉर हॅबिटेट इंडिया तसेच डी.सी.बी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गरजुंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. गोरेगाव दिंडोशी येथील संतोष नगर, जयभीम नगर, दळवी कंम्पाऊंड, सिंग कंम्पाऊंड, नागरी निवारा परिषद, बी.एम.सी. वसाहत, श्रीकृष्ण नगर, जलधारा गृहनिर्माण संस्था, आरे कॉलनी युनिट क्रमांक १३ तसेच वडके कंम्पाऊंड येथील सुमारे १०० गरजुंना या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असून अजुनही काही जणांना मदत करण्यात येणार असल्याची माहिती, सिंधुदुर्ग एकता विकास मंचाचे अध्यक्ष अरुण साटम यांनी सांगितले.